आमच्याविषयी

आपल्याला काही म्हणावयाचे असते. आपल्याला म्हणजे पत्रकारांना आणि वाचकांनाही. जे म्हणायचे आहे, ते सगळेच जसेच्या तसे म्हणता येईल, अशा जागा प्रस्थापित माध्यमांमध्ये फार कमी उरल्या आहेत. म्हणून मग आपल्याला जे वाटते ते म्हणायचेच नाही का ? त्याला वाट करून द्यायचीच नाही का ? सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असला तरी त्याच्या म्हणून काही मर्यादा आहेत. ‘बिगुल’ची सुरुवात करताना हाच विचार केंद्रस्थानी आहे. जग झपाट्याने बदलतेय. डिजिटल युगात नवनवीन गोष्टी घडताहेत. पत्रकारिताही त्याला अपवाद नाही. ऑनलाइन पत्रकारिता वाढू लागली आहे. मुद्रित आवृत्त्यांच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओलांडून भाषिक पत्रकारिताही वैश्विक बनत आहे. पत्रकारितेमध्ये तंत्राच्या अंगाने होणारे बदल महत्त्वाचे आहेत, तसेच आशयाच्या अंगाने होणारे बदलही महत्त्वाचे आहेत. ‘बिगुल’ हा नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार आहेच, परंतु पत्रकारितेतल्या उच्च मूल्यांशी बांधिलकी मानून स्वीकारलेले व्रत आहे. धर्मनिरपेक्ष मूल्यांची पाठराखण, तसेच लोकहित आणि लोकशाही हक्कांचे रक्षण ही ‘बिगुल’ची भूमिका आहे.

संपादक- मुकेश माचकर

कार्यकारी संपादक- सायली परांजपे

संपर्क: bigulresponse@gmail.com
          bigulcontact@gmail.com