फेबुगिरी
गुरुवार, २६ जानेवारी , २०१७ टीम बिगुल

ताज्या घडामोडींबाबत किंवा अन्य कोणत्याही विषयांवर सोशल नेटवर्किंगसाइट्सवर व्यक्त होणा-यांची संख्या मोठी आहे. यातल्या काही निवडक पोस्ट्स खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी:

लहानपणी तुमच्यासोबत माझ्यासोबत अमुकढमुक सेक्सच्युअल हरॅसमेंट झाली.. मग.. आता मोठे झालात नं. प्रत्येक जखम भरते. तिला जीभ लावून ओलं ओलं करून देणं सोडलंत तर. आधीचा गाळ सोडून दे.. पाऊस कधीचा सांगतो आहे. तोच यातून तुझी सुटका करेल. त्यालाही ती हवी असेल. जावं बाहेर आणि भिजावं चिंबचिंब. ज्यांना जे करायचं होतं आपल्यासोबत ते ते करून गेलेले आहेत. कापून टाकायची त्या आठवणींत अजूनही रूतलेली आपली मूळ. कारण आयुष्य फार छोटं आहे आणि हरामीसुद्धा.
- रेणुका खोत
...........
आता दुरून पाहताना रम्य वाटतात पण खरं सांगायचं तर गावं फार स्तब्ध आणि कंटाळवाणी होती. दिवस उजाडून माणसं कामाधामाला पांगली की सांजेला माघारा येईस्तोवर अक्षरश: काही म्हणजे काहीही घडत नाही गावात. धूळ असते आणि फुफाटा आणि चौफेर दाटून आलेलं उन्ह. क्वचित डमरू वाजवत आलेला एखादा गारुडी किंवा वर्षाला गावाशिवेवर भरणारी जत्रा याशिवाय कधीही उत्साहाच्या लाटा नाहीत. झाडावर चढून आरोळ्या देणारा पांगुळ बघायलासुद्धा बेफाम गर्दी व्हायची. माणसं फारशी शिकलेली नसली तरी अडाणीही नव्हती. आपापले स्वार्थ, आपापल्या श्रेष्ठत्वाच्या, जातीय गंडांच्या आणि मानपानाच्या कल्पना सगळ्यांना माहीत असतं.
मिरासदारांच्या कथांमध्ये असतात तशी एकजात मूर्ख माणसं असलेलं एकही गाव नसेल. मला मिरासदारांच्या कथा खूप आवडतात पण मिरासदारांनी गावातली माणसे कायमच मूर्ख रंगांत रंगवली, हे फार वाईट आहे.
- बालाजी सुतार

...........

काही दिवसापासून मी आमच्या जनावरांसाठी पतंजलीचा गहू भुसा व पेंड वापरतोय.
जनावरं भरपुर खुश आहेत त्यामुळे. 
काल तर आमची म्हैस गाणं गुणगुणत होती.
हम्मा हम्मा..
असं काहीसं..
गायीला गोमातेचा दर्जा देताहेत..
गेला बाजार आमच्या गाणे म्हणणार्या म्हैशीला म्हेसमौशी तरी द्यायला हवा..
राष्टम्हैस पण चालेल बरं..
असं ऐकून आहे की म्हैस २४ तास दूध देते
आणि २४ तास शेण
गाय हंबरली की मंदीरात आपोआप घंटा वाजतात
पण एक आहे की गाय संन्यस्त आहे.त्यामुळे एक प्राॅब्लेम होतोय.
बैल चढवून घेत नाही किंवा तिला कृत्रिम रेतन पण आवडतं नाही
त्यामुळे जरा दूधात अडचण जाणवते
पण बाबा यावर काहीतर नक्कीच उपाय शोधातील. 
तीच्या शेणाला चंदनाचा सुगंध येतो.त्यामुळे शेण काढताना मन प्रसन्न रहाते. घरात या वासाच्या आकर्षणामुळे शेण काढायला चढाओढ लागते.
गोमुत्राच्या वासाने डास गोचीड,पिसवा,कुक्कुडवा वगैरे काहीही दोन किलोमीटरमधे फिरकत नाहीत.
शेजार्यांच्या पोराने एकदा चुकून पेलाभर दूध गाईंचं प्याला तर त्याला चांगली नोकरी मिळाली.
एकाच्या अंगावर चुकून काही थेंब गोमुत्राचे उडालेले त्याचे खुप दिवसांपासून रखडलेले लग्न झाले.
जै गोमाता.
जै पतंजली...
टिप - हा मेसेज जास्तीतजास्त शेअर करा. चांगली बातमी मिळेल..
- सर्जेराव जाधव

...........

माओचा रिझल्ट आल्यावर मला माझा रिझल्ट आठवला- 
"गाढवा, गणितात दहा मार्क?"
"मग? दहा मार्काच्या पेपरला वीस मार्क द्यायला मास्तरीण काय माझी मावशी लागून गेलीय का? बाबा, गणिताच्या बाई तुमची चौकशी करत होत्या..."
(दबक्या आवाजात) "हळू बोल गधड्या! (मोठ्यानं) आणि मराठीतही दहाच?"
"हो. शुद्ध मराठीत लिहिलं की आमच्या मुचकंडीसरांना कळत नाही. मग ते मार्क कापतात."
"म्हणून काय वीसपैकी फक्त दहा मार्क?"
"मी सरांना न कळणारे एकूण नऊ शब्द लिहिले होते. त्याचे नऊ मार्क कट झाले."
"तुला बारा मार्क असले पाहिजेत."
"हो, पण दहा हा माझा शुभ आकडा असल्यानं मीच त्यांना एक मार्क कमी करायला लावला."
"गाढवा! अशानं वर्गातला नंबर खालीखाली आणशील. कितवा आलाय?"
"सोळावा."
"बघ! पंधराजण तुझ्यापुढं गेले."
"पंधरा नाही, अकराजण!"
"आं? मला गणित शिकवतोस तू?"
"अहो बाबा, यावेळी पेपर इतके टफ होते की पहिले चार नंबर कुणालाच मिळाले नाहीत."
- ज्युनियर ब्रह्मे

...........

पुण्यातील बोळात एक चांभार आहे,
त्याच्या दुकानाची पाटी भाषेचा उत्तम नमुना आहे,
मराठीतच आहे ,
पण वाटते संस्कृत -
गतप्राण पादत्राणात पंचप्राण फुंकणार 
अल्प काळापुरतेच
'भरत पादुका शुश्रुषा भांडार', पुणे ३०
घेतो तुमची आण,
देतो शिवून पायताण
बाकी 'चांभारचौकशा' करू नयेत.
- कैलास टेकवडे
...........
परवा एका आईने विचारलं. आम्ही दोघे-आईबाप- मुलाला खूप वाचायला उपलब्ध करून देतो. तो विवेकी होईल अशीच खबरदारी घेतो. त्याचाही देवावर विश्वास राहिलेला नाही.
पण...
अकरा वर्षांचं पोर. शाळेत, मित्रांच्यात त्याला फार ऐकून घ्यावं लागतं. ये देखो, ये गणपतीपरभी विश्वास नहीं करता. क्या समझता है... तर तो थोडासा बिचकून जातो. अशा वेळी काय करायचं.
--
मित्रांचा, समाजाचा दबाव असा इतक्या लवकर सुरू होतो. आणि तरीही ठामपणे जे योग्य वाटते, सत्य आहे हे माहीत आहे त्यासाठी ठाम रहाणे. कठीण असतेच, पण अशक्य नाही हे अशा मुलांना सांगावे लागेल. बळ द्यावे लागेल. दहा हजार जण विश्वास ठेवत असले तरीही असत्य ते असत्यच रहाते आणि एक माणूस सांगत असला तरीही सत्य ते सत्यच असते हे नव्याने विवेकाच्या वाटेवर चालणाऱ्या मुलांना सांगावे लागेल.
---
या वाटेवर पालकांनी बोट धरून आणलेल्या थोड्या पण महत्त्वाच्या मुलांसाठी नास्तिक परिषदांच्या आयोजकांनीकाही कार्यक्रम हाती घ्यायला हवेत. अनबिलाँगिंग- एकला चालो रे वगैरे जरा अवघड होते लहान वयात. तेव्हा आपल्यासारखेच अनेक जगात विखरून आहेत हा दिलासा मोठा असेल.
- मुग्धा कर्णिक

...........

न्यायालयांत निकाल मिळतो. न्याय मिळतोच असं नाही. तरी ज्या संघर्ष करत राहतात त्या बिलकिस सारख्या बायकांवर मी जीवापाड प्रेम करते. निकाल ज्यांच्या बाजूने लागतो त्यांनाही असं प्रेम लाभत नाही. अगदी मारतेवेळी नाही तरी मरतेवेळी त्यांना आपले गुन्हे स्मरतील आणि ते स्वत:चाही तिरस्कार करतील. हाय लागून हाल हाल होवून मरतील. बिलकिस, तू ब्र उच्चारलास, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलेय. तू नायिका आहेस.
- कविता महाजन

...........

अज्ञानात सुख असतं...
आशियातील सर्वात मोठ्या रेडलाईट एरियात (कोलकत्त्यातील सोनागाछी) चाईल्ड प्रॉस्टीट्युशनचं धंद्यात दाखल होण्याचं (एन्ट्री / admit) वय केवळ सात वर्षे आहे....
आपल्या संस्कृतीभोक्त्या देशात वासनेचा हा 'अद््भूत ट्रेंड' सुरु होऊन किमान दोन दशके झालीत...
दाखल झालेल्या पहिल्या 'बॅच'चे थ्रोआऊट वय (एजबार / रिटायरमेंट / निवृत्तीवय) फक्त अठरा वर्षे आहे... अकरा वर्षात या कळ्या अशा कुस्करल्या जातात की यांचे देठ देखील शिल्लक राहत नाही...
आजघडीला देशातील अदमासे नऊ लाख वेश्यांपैकी तीस टक्के वेश्या नाबालिग (सज्ञान नसलेल्या / अपरिपक्व) आहेत...
म्हणजे जवळपास तीन लाख मायनर मुली या दलदलीत रुतल्या आहेत अशी अधिकृत आकडेवारी सांगते...
मृत्युमुखी पडलेल्या एका निर्भयाला 'अर्धवट' न्याय द्यायला आपल्या व्यवस्थेने देशाने पाच वर्षे खाल्ली. इथे जिवंतपणी नरक भोगणाऱ्या तीन लाख मुलींचे दोषी, अपराधी, गुन्हेगार आणि शोषक कोण आहेत याची तसूभर माहिती यंत्रणांकडे नाहीये मग त्यांच्यावर कारवाई होणं अन या पोरीबाळींना न्याय मिळणे स्वप्नात देखील शक्य नाही...
- समीर गायकवाड

...........

बसमध्ये पुढे बसलेला प्रवासी मागे बसलेल्याला "माफ करा पण , मी माझी reclining सीट मागे घेतोय, चालेल ना?" असे सौजन्याने विचारतो. असेच जपानमध्ये घडत असेल असे आपल्या मनात असते. पण दुनिया गोल है! काही न बोलता आपली सीट धाडकन मागे घेणारे महाभाग तिथेही आहेत. त्यावरून अनेकदा भांडणेही होतात. यावर खागोशिमाराज्यातील एका ड्रायव्हरने- योशिनाओ मुरासे ने- शक्कल शोधून काढलीय. तो बस सुरू करताच आवाहन करतो, "मागे बसलेल्या प्रवाशाचा विचार करून तुम्ही सीट मागे घेण्यास संकोच करत आहात ना ? सारे एकदमच सिटा मागे घेऊयात. म्हणजे कुणात कटुता नको. चला!"
जपानी लोक असे वेगळ्याच रसायनाने बनलेली असतात. नेहमी समोरच्याचा विचार. आपल्यामुळे कुणाचे काही नुकसान तर होत नाहीये ना? असा विचार. समाजासाठी हा खूप चांगला विचार वाटतो. जपानी भाषेमध्ये पण तसे शब्द प्रयोग पाहायला मिळतात. दुसऱ्याला आदर देण्यासाठीची भाषा, स्वतः ला अधिक नम्रपणे सादर करण्याची भाषा इत्यादी. आता हे सर्वच भाषांमध्ये आहे , पण जपानी भाषेत हे अधिक जाणवते की, समोरचा कशी भाषा वापरतोय यावर तो तुम्हाला किती आदर दाखवतोय हे ठरवले जाते.
याउलट अशीही शक्यता असते की असे शब्द फेकून जपानी लोक सौजन्याची 'अॅक्टिंग' तर करत नाहीयेत ना? कदाचित व्यावसायिक गरज म्हणून त्यांना तसे वागावे लागत असेल. त्यामुळेच असेल, पण काही जपानी लोकांना भारतात आल्यावरच छान वाटते. ते म्हणतात, तुम्ही कुठेही असा, पण तुम्ही भारतीय खूप 'नॅचरल' वागता. रस्त्यात वागताना, सार्वजनिक ठिकाणी, घरी जिथे तुम्ही व्यक्त होता ते हृदयापासून आलेले असते.
असो. तर अशा या दोन संस्कृती. समोरच्याचा विचार करणेही महत्त्वाचे आणि एका दूरध्वनीसेवेच्या कंपनीचे बोधवाक्य होते तसे EXPRESS YOURSELF- स्वत:ला व्यक्त करणेही महत्त्वाचे. तर या दोन्हींचा समतोल राखून आपण वागले पाहिजे, नाही का ?
- हर्षद विजय फडके

...........

आज जयंत दिवाणला भेटलो।
काही दिवसांपूर्वी तो बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात जाऊन आला। चंपारण्य सत्याग्रहावर जयंतने छान पुस्तक लिहिलं आहे। या विषयावरचं मराठीतलं हे एकमेव पुस्तक।
सुमारे दहा वर्षांनी जयंत तिथे गेला।
रस्ते आणि कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाली आहे, शिक्षण, आरोग्य व्यवस्था ह्यांची आबाळ सुरू आहे। सरकारी शाळा वा कॉलेजांमध्ये शिक्षक नसतात। मुली सायकलवरून शाळेत जातात केवळ भोजनासाठी। कॉलेजमध्ये फक्त प्रवेश घेतात मुलं, शाळा असो की कॉलेज कोचिंग क्लासेसचा धंदा तुफान चालतो।
एक मुसहर भेटला। झाडावरून पडला होता, रस्त्यावर छत्री उघडून बसला होता। झाडावरून पडून चार-पाच दिवस झाले होते। खुरडत घराबाहेर आला। जयंत आणि काही कार्यकर्ते त्याला इस्पितळात नेण्याच्या कामाला लागले। चार माणसं हवीत, पण मुसहर म्हणाले याला इस्पितळात घेऊन जायचं म्हणजे आम्हाला एका दिवसाच्या रोजगारावर पाणी सोडावं लागेल। इस्पितळात अनागोंदी होती। ती पाहून जयंत हैराण झाला।
महादलितांची वस्ती असा बोर्डच होता तिथे।
लोक नि:संकोचपणे एकमेकांना जातीच्या नावाने पुकारायचे। मी भूमिहार आहे असं एक बाई कारण नसताना सांगत होती।
तिथे औद्योगिकरण नाही, नोकऱ्या नाहीत, शेतजमिनीची मालकी हाच तिथला मूळ संघर्ष आहे। काही दशकं। जमीनदारी अजूनही आहे।
जयंत हताश होऊन म्हणाला।
चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी झाली।
या सत्याग्रहाने लोकांना निर्भय बनवलं, गोऱ्या साहेबाला म्हणजे मळेवाल्यांना लोक घाबरेनासे झाले। ब्रिटिश सत्तेला त्यामुळे आव्हान मिळालं।
आज हा आत्मविश्वासच लोकांनी गमावला आहे। सर्व काही सरकार करेल, सरकारनेच करायचं असतं आपण फक्त जातीनुसार मतदान करायचं अशी लोकशाही रुजलीय।
या देशात कसला डोंबलाचा फॅसिझम वा समाजवाद येणार?
- सुनील तांबे 

...........

एक मराठा लाख मराठा
एक मुसलमान लाख काफीरो पे भारी
एक महार लाखोची हार
एक सरदार सव्वा लाख के बराबर
असल्या घोषणांत अडकलेले समूह हे कधीच स्वतःला खड्ड्यात घातल्याशिवाय रोखू शकणार नाही. गेल्या वर्षभरात जो काही माज सर्व जातसमूहांना राज्यात आणि देशात निर्विवादपणे बोकाळू दिला त्याची फळे येत्या काही दिवसात जरूर चाखायला मिळतील. शहाणे सुरते वेळीच सावरलेत. पण या शहाण्या सुरत्यांच्या क्षणिक मूर्खपणापाई अर्धवट हिंसक बांडगुळं जन्मून गेलीयेत त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आलेली आहे असे तरी एकूण दिसते आहे. मोठे काही होणार नाही. छोटे छोटे होईल. केंद्रीय पातळीवर युद्ध लढले जाण्याची चिन्ह दिसत असताना भारत एका गृहयुद्धाला सामोरा जाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचलाय. या स्थितीस उजव्यांच्या ताकदीला जबाबदार धरणार नाही. तर, स्वघोषित पुरोगामी शक्तींचा कुचकामीपणा, स्वप्रेमाच्या स्वप्नरंजनाचा प्रखर विश्वास, इतरांविषयीचा तुच्छतावाद, साठच्या दशकातला शुद्धतावाद तसेच राजकिय पटलावर कोणतीही इच्छाशक्ती न बाळगल्याचा दुष्परिणाम आहे.
या स्थितीतून आपली सुटका नाही.
- वैभव छाया

...........

"कोणते तरी नाते नसतेच प्रत्येकाच्या आयष्यात. एकाला मामा नसतो, तर एकाला धाकटा भाऊ नसतो किंवा कोणाला आत्या नसते, त्याने काही फरक पडतो का त्याच्या आयष्यात ? तसेच आपल्या घराला देव नाही, काय फरक पडतो नसला तर, सांग ?"
माझ्या मुलांना मी 'आपल्या घरात देव का नाही असे विचारले' तेव्हा हे सांगितलेय.
मुलांना 'देव नाही' हे ठाम सांगत बसण्यापेक्षा 'देवाची गरजच नाही' (God is irrelevant, either way !) हे सांगणे जास्त गरजेचे आहे असे वाटते.
दुनियादारीचे नियम, टेन कमांडमेंटस मात्र घट्ट पाळा एवढेच सांगावे आपणतरी, बाकी त्यांचे ते बघून घेतील.
आपल्या मुलांना कोणत्या वयात काय सांगायचे हे ज्याला कळत नाही तो नास्तिक दूर, पालकही होऊ शकत नाही. अनेक दुराग्रही नास्तिकांची मुले वैदिक लग्नापासून इतर कर्मकांडांकडे वळताना पाहिली आहेत.
'देव आहे' किंवा 'देव नाही' हे त्याचे त्याला ठरवू देणारे वातावरण त्याला देणे इतकेच पालक म्हणून काम असते.
देव आहे का नाही हे तपासताना बरेच आयुष्य वाया जाते. त्याची, देवाची, गरजच नाही म्हंटले की बाकी 'जगता' येते.
- विनय गुप्ते

...........

 

न सुटलेले प्रश्न.
.
रायमन सिद्धांत, गोल्डबाख सिद्धांत व. व.
.
तर,
दुकानावर पाटी.
.
निवडक किराणा मिळेल.
.
प्रश्न
.
निवडकच का, सगळा का नाही?
.
निवडक, की निवडलेला?
.
दुकानदाराला विचारण्याचे धाडस केले नाही.
किलोचे वजन डोक्यात मारले असते.
- विवेक घारपुरे
............
देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा, ही तरी मागणी फेसबुकवरून करायची परवानगी द्यावी मिलॉर्ड.
अरुण जेटलींसारखा अर्धवेळ संरक्षणमंत्री असताना एकाच गोष्टीची खात्रीलायक भीती आहे मिलॉर्ड ती म्हणजे, सैनिकांना बंदुकीच्या गोळ्या चालवण्यावर तर टॅक्स नाही ना भरावा लागणार? सैनिकांना युनिफॉर्म वापरण्यावर किंवा बूट जितकं अधिक वेळ घालू त्यानुसार विशिष्ट प्रमाणात कर नाही ना भरावा लागणार? सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेटवर अधिक सरचार्ज नाही ना पडणार??
ता. क. राष्ट्रपती करून टाका या माणसाला... सामान्य माणसाशी पूर्णपणे नाळ तुटलेला मनुष्य म्हणजे जेटली .
- सौरभ गणपत्ये

............

हरिद्वार - बुधवार, तीन मे २०१७
पतंजली लुजमोशन पिक्चर कंपनी बनवत आहे एक बिगबजेट फिल्म. ज्या फिल्मचं नाव आहे, ''ब्रह्मांड-२".
ही फिल्म २०१९ मध्ये रिलीज करण्याचा कंपनीचा मानस आहे. अतिशय तगडी स्टारकास्ट आणि महाकाय बजेट, स्पेशल फोटोशॉपीक स्पेशल इफेक्ट्स ही या फिल्मची जमेची बाजू असून ही फिल्म संपूर्ण ब्रह्मांडात एकाचवेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या फिल्मचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट म्हणजे ही फिल्म शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने बनवली जाणार आहे. एक नजर या फिल्ममधील स्टारकास्टवर.
ब्रह्मांडनायक - आदरणीय नमोजीहुकूम 
ब्रह्मांडसहनायक- प्रम्प्रिय अमितशा
ब्रह्मांडखलनायक - पर्मनंट सामनावीर 
ब्रह्मांडनायिका - स्मृतिराणी
ब्रह्मांडसहनायिका -उमाभार्ती
ब्रह्मांडखलनायिका - मोमता बनोर्जी
ब्रह्मांडविनोदिनायक -सर्वसाक्षी महाराज
ब्रह्मांडविनोदिनायिका - ऋतुंबरा 
ब्रह्मांडगीतकार - ए. रामदास, वि. कुमार 
ब्रह्मांडसंगीतकार - प्रीतमप्यारे 
ब्रह्मांडगायक - बाबूलो सुप्रियोयो 
ब्रह्मांडगायिका - णाणीवैणी
ब्रह्मांडदिग्दर्शक - गजेंद्रसिंग 
ब्रह्मांडनिर्माता - बी. मोहन
ब्रह्मांडवितरक - वाय. रामदेव अँड बी. आचार्य प्रायव्हेट लिमिटेड.
- सुहास नाडगौडा

............

"तुझ्या फेसबुकवरील लिखाणाने काहीही बदल घडणार नाही"
असं मला सांगणारे लोक
जेव्हा
"भारत-पाकिस्तान समस्या कशी सुटेल"
"नक्षलवाद कसा संपवायचा"
"शेतकरी समस्या कशी सुटेल"
या विषयांवर
फेसबुकवरच चौफेर विचाररत्न उधळतात
तेव्हा...
गंगाधर हा खरंच शक्तिमान आहे काय, हा प्रश्न मनात निर्माण होतो.
- ओंकार दाभाडकर

............

जिसकी कॉल हिस्ट्री, डेटा, अॅप्स सबकुछ डिलिट कीए गये है, सिमकार्ड निकाल फेंका है ऐसा एक अच्छासा स्मार्टफोन मुझे कल रस्ते मे मिला. मैने वो मोबाईल नगरपालिका के अॉफीस मे ये कहकर जमा किया की ये आपके किसी कॉर्पोरेटर या अफसर का है।
=> किस आधार पर आप कह रहे हो कि ये हमारे कॉर्पोरेटर या अफसर का है?
=> सर, कॅल्क्युलेटर शुरू करो. अब, मोबाईल की काच देखो. कीबोर्ड पे जहाँ परसेंटेज का चिन्ह है उसी जगह सबसे जादा घिसी हुई है!!
- सॅबी परेरा

............

# माझ्या_लोकप्रियतेच्या_कथा
स्थळ - मनशक्ती केंद्र लोणावळा
माणूस (संशयाने पाहत) - तुम्ही... तुमचं.... ते हे... आपलं.... तुम्ही ते संगीत क्षेत्रात काम करता? 
मी - (विनम्र हासत) हो.
माणूस - हां!!! (विजयी मुद्रेने) दमलेल्या बाबाची कहाणी!! 
मी (तरी हसतच) - नाही! 
माणूस - मग ते कोण?
मी - ते कुलकर्णी! 
माणूस - मग तुम्ही कोण? 
मी - मी इनामदार
माणूस - तुमचं 'फेसिंग' सेम आहे ना! 
मी - नाही खरं तर. ते उंच आहेत. 
माणूस - हां... मग तुम्ही ते लहान मुलांच्या सीडी करता ते तुम्ही! 
मी (अत्यंत शूरपणाने हसू तसंच ठेवत) - नाही हो!
माणूस (हतबलतेचा भाव) - मग तुम्ही काय केलंय? (खरं त्याला केलंय तरी काय असं म्हणायचं होतं)
मी - सिनेमा केलाय आत्ता. 
माणूस - हां!! बरोबर!! (क्षणभराने) कुठला? 
मी - रंगा पतंगा
माणूस - हां!!! (आत्मविश्वासाने) सिद्धार्थ जाधव! 
मी - मकरंद अनासपुरे
माणूस - हां तेच! झाला आत्ता झी वर. बरंय!! छान वाटलं भेटून. 
मी - हो मला पण!
- कौशल इनामदार

............

काही दिवसांपूर्वी लोकांच्या हातात झीरो कॅश ठेवली. आता झीरो बॅलन्स नको म्हणतायत. त्या किमान बॅलन्सवर व्याज कोण देणार आहे? ब-याच एटीएममध्येही पैसे नाहीयेत. मोठ्या प्रमाणावर चलनतुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. लोकांना अकाऊंटला तीन आणि पाच हजाराचा बॅलन्स ठेवावा लागणार असेल तर एवढे पैसे अडकवून करणार काय आहे आरबीआय? नोटबंदी स्वतःच्या हौशीखातर मोठ्या टिमक्या वाजवत केली मोदीशेटने. आता आपली काहीच जबाबदारी नसल्यासारखं तीर्थस्थानाला भेट दे, तुर्कस्थानच्या कुत्रंही न विचारणा-या राष्ट्राध्यक्षाला बोलाव असले उद्योग करू लागलेत. आम्हाला शिकवता पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा वगैरे, यांनी किती राखली? आणि आपला रोजचा घाससुद्धा हिसकावून घेणारा हा माणूस आपल्याला मसीहा वाटतो. हे कुठलं मानसिक दारिद्रय आहे?
- कोमल कुंभार

............

साबुदाण्याची खिचडी 
हा असा पदार्थ आहे की वरकरणी सोपा वाटला तरी थोड्या मंडळींना तो साधतो. साबुदाण्याची जात, भिजवायची रित इथपासून प्रत्येक घटक जमून यायला लागतात. उकडलेला बटाटा हिरवी मिरची कोथिंबीर घालून केलेली खिचडी आणि त्यावर ओला नारळ, सोबत कवडी दही व लिंबाची टवटवीत फोड हा मेनू नाश्ता किंवा जेवण या दोन्हीला पर्याय ठरू शकतो.
अनेकांची खिचडी लोचा होते, फारच सुटीसुटी होते किंवा अर्धवट शिजलेली राहते. मग चवीची गंमतच संपते. अनेकदा दाण्याचे कूट कमी पडते मग नुसत्या साबुदाण्याची चव कशीशीच लागते. 
साबुदाण्याच्या अर्धा भाग तरी दाण्याचं कुट असेल तर उत्तम. वाफेवर शिजवताना झाकणीत पाणी ओतून वाफवली की वाफ मुरते आणि पाण्याचं प्रमाण योग्य राहतं. मिरचीचे काप, स्वादासाठी साखर आणि थोडे दही असेल तर मजा औरच.
माझ्या आठवणीत आमच्या आईच्या घरी दर गुरुवारी रात्री खिचडी हा मेन्यू असे आणि मी गुरुवारची वाट पहायचो.
पुण्यात स्वीट होमची आणि जिमखाना अप्पांच्या कँटिनची खिचडी उत्तम. स्वीट होमची खिचडी कच्ची पक्की. साबुदाणा कमी पण त्याच्या बरोबर खास चटणी खायची रित. अप्पा खिचडी ही खमंग काकडीबरोबरच खायची. स्वीट होम आणि अप्पा दोघांनाही निष्ठावंत मंडळींचे जबरदस्त फोलोईंग. (माझे असे मत आहे की घरची खिचडी आज कशी होईल याची खात्री नसल्याने स्वीट होम आणि अप्पा यांचे चाहते वाढून गेले असावेत)
मुंबईला जाताना दत्त, बंगलोर हायवेवर विरंगुळा ही प्रवासात खिचडी खाण्याची स्थाने.
पुण्यात रस्त्यावर खिचडी डबे घेऊन अनेक ठिकाणी विक्रेते असतात. बहुतेक सर्व हॉटेलात खिचडी मिळते पण नेहमी तिथे खिचडी चांगली असेल अशी खात्री वाटत नाही.
माझ्या सारखेच अनिल अवचट खिचडी प्रेमी आहेत. छंदांविषयी पुस्तकात त्यांची खिचडीबददल लिहिले आहे.
आम्ही सर्व कानिटकर खिचडी प्रेमी आहोत. मोठे चिरंजीव तर अमेरिकेत स्वतः बनवतात आणि त्याचे खिचडीप्रेम लक्षात घेता तो ती उत्तमच बनवत असणार. गौरी तर उत्तमच बनवते. घरी साबुदाणा भिजलेला असतोच. त्यामुळे कुणी कधीही आलं तरी मायक्रोवेव्ह खिचडी पाच मिनिटात. 
मला प्रामाणिकपणे वाटते की घरच्या खिचडीला पर्याय नाही. दही, खमंग काकडीने एक वेगळे डायमेनशन येते पण कोणतीही जोड न देता गरम गरम खिचडी खाण्याला तोड नाही.
- महेंद्र कानिटकर

............

 प्रतिक्रिया द्या2970 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
विजय गागरे - गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७
खुप छान
Kiran - शुक्रवार, ५ मे, २०१७
सर्व लेख छान . साबुदाणा खिचडी खास !
अभिजित लिगदे - बुधवार, ३ मे, २०१७
बिगुल ने आम्हाला काही कारणानेन दिसणाऱ्या पोस्ट ,दिसण्याचा आणि वाचनाचा आनंद मिळवून दिलाय
swati s dharmapurikar - सोमवार , १ मे, २०१७
Bigul bhari ye han...
गंगाधर टिपरे - सोमवार , १ मे, २०१७
भन्नाट फेसबुकगिरी. 👌
प्रदीप गायकवाड - सोमवार , १ मे, २०१७
छान निवड ........
प्रतिभा भोसले - शनिवार, २९ एप्रिल, २०१७
संध्या सोमण यांची पोस्ट अप्रतिम
अरुणा पेंडसे - शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७
मस्त पोस्टस्. विठ्ठल कारळेंची विशेषच! 👍
विजय तरवडे - बुधवार, २६ एप्रिल, २०१७
किरण माने, कृपया त्या तिघांच्या फेबु प्रोफाईलची लिंक द्यावी, ही विनंती
विजय तरवडे - सोमवार , २४ एप्रिल, २०१७
आवडलेल्या टॉप ३ १.ते म्हणाले... (राजेश मंडलिक) २.नेहमी चुकणारे शब्द (श्रीपाद ब्रह्मे) ३.ल्युमिनस ब्याटऱ्या इकणारा... (माणिक कुरणे)
गंगाधर टिपरे - शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
सर्वांचीच फेसबुकगीरी अप्रतिम
हणमंत अतकरे - रविवार, १६ एप्रिल, २०१७
लेपाटं, व इतर पोस्टी छान वाटल्या.
Nilesh Bandale - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
दरवेळी नवीन वाचायला मिळते. हे नवीन म्हणजे नवनीत असते, असं म्हणायला हरकत नाही. आनंद शितोळे, श्रीकान्त उमरीकर, मीराबाई सिरसमकर, ओंकार दाभाडकर इ. व सर्वच पोस्ट कर्त्यांनी फेबुच्या चरकातुन चोथा झालेल्या विषयांनाही ज्या सहजतेने जिवंत केले त्याचे महत्व बिगुल सारख्या त्रयस्थ ठिकाणी आल्यानंतरच कळते. ’ बहुतांची अंतरे’ हा शब्द मला मटाने दिला. त्याचा प्रत्यय आता इथं येत राहतो.
Ravindra Gandhi - शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७
Reading Bigul since many days... fantastic idea .....great selection of posts... like like like
गणेश विसपुते - गुरुवार, ६ एप्रिल, २०१७
इतकं वैविध्यपूर्ण आणि वेचक तरीी वेधक असं वाचायला मिळतं आयतं. खूप आभार.
प्रतिभा भोसले - गुरुवार, ६ एप्रिल, २०१७
सर्व लेख खूप छान. लेखकांचे व लेखांची निवड करणा-यांचे अभिनंदन
विवेक ताटे - बुधवार, ५ एप्रिल, २०१७
धन्यवाद
गणेश तोडकर - शनिवार, १ एप्रिल, २०१७
आनंद शितोळे, , विजय सुतार यांच लिखाण आवडल
विजय सुतार - शुक्रवार, ३१ मार्च, २०१७
सर्व लेख अप्रतिम आहेत. इतक्या खास मंडळीसोबत आपलंही काही प्रकाशित झालेलं पाहून आनंद वाटतोय मुकेशराव .. आभारी आहे.
Sudhir jadhav - शुक्रवार, ३१ मार्च, २०१७
खुप छान लेख आहे​त
विजय तरवडे - शुक्रवार, २४ मार्च, २०१७
अतिशय आभारी आहे.
Parmeshwar Asabe - शुक्रवार, १० मार्च, २०१७
Perfect,
विद्याधर पोखरकर - गुरुवार, ९ मार्च, २०१७
एखादा दिवस साजरा करण्याचा नेमका उद्देश काय असतो हेही अनेकदा नीट समजून घेतले जात नाही. ज्या गोष्टीकडे समाजाचे दुर्लक्ष झालेले असते त्याकडे लक्ष वेधले जावे यासाठी खरेतर ते - ते 'दिन' असतात. म्हणजे महिलांना जगात दुय्यम स्थान मिळते त्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी; आणि त्यात बदल व्हावा यासाठी असा 'दिन' साजरा करण्याचे ठरले असावे. पण ती समस्या कायम असताना केवळ 'आज आमचा दिवस आहे,' असे म्हणत काही महिला चक्क नाच-गाण्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात! अशा वेळी नंतर काय, असा प्रश्न त्यांना कसा काय सतावत नाही याचे आश्चर्य वाटते.
अमोल चंद्रकांत कदम - बुधवार, ८ मार्च, २०१७
सर्व महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा!!! ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ विशेष लेख : आधुनिक भारताचा विकास आणि त्यातील स्त्रियांचे योगदान ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ भारत हा वेगवान प्रगती करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. भारतात वर्षानुवर्षे पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांचा उदय झाला आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गार्गी आणि मैत्रेयी यांच्या पासून सुरु झालेला हा प्रवाह अखंड चालत आला हे नाकारता येणार नाही. आज अमेरिकेच्या स्वातंत्र्याला 240 वर्षे उलटून गेली तरीसुध्दा त्या देशाच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान झाल्याचा इतिहास अस्तित्वात नाही. याउलट भारताच्या स्वातंत्र्याला अवघी 25 वर्षे व्हायच्या आधीच इंदिरा गांधीच्या वतीने पहिल्या महिला पंतप्रधान प्राप्त झाल्या. प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने भारतात महिला राष्ट्रपतीसुध्दा झाल्या. भारताच्या सैन्यदलात महिलांचा समावेश केल्यानंतर या क्षेत्रात कमालीची सुसुत्रता आली. सावित्रीबाई फुले यांच्या रुपाने स्त्रीशिक्षणाचा सुरु झालेला अखंड प्रवास हा आज अतिशय उत्तम प्रगतीच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. महर्षी कर्व्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न सुध्दा फळाला येताना दिसत आहेत. त्याची उदाहरणे आपण गेली काही दशके सातत्याने पाहतो आहोत. वैद्यकशास्त्राची पदवी मिळवून डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशींच्या रुपात पहिल्यांदा एका महिलेला आपणांस पाहता आले. आज गावागावात महिला डॉक्टरांची प्रचंड दिसणारी संख्या प्रामुख्याने या प्रवासाची वेगवान वाटचाल दाखवून देते. विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू व सुचेता कृपलानी यांच्या पासून महिलांनी राजकारणाची करण्याची चळवळ वाढली आहे. हे आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात 50 टक्क्याहून अधिक प्रमाणात असलेल्या महिलांनी दाखवून दिले आहे. राजकारणाचा प्रभाव उमटवणाऱ्या महिलांमध्ये इंदिरा गांधी, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती, सुषमा स्वराज, शीला दीक्षित, सोनिया गांधी, स्मृती इराणी, उमाभारती यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. मीराकुमार यांच्या वतीने लोकसभेच्या सभापती पदाचा कारभार एका महिलने सक्षमपणे हाताळल्याचे लक्षात येते. मादाम कामा, मदर तेरेसा, भगिनी निवेदिता, अनी बेझंट, इरावर्ती कर्वे याच्या स्वरूपात सामाजिक कार्यात महिलांचा प्रभाव संपूर्ण भारताने अनुभवला. या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याची धुरा समर्थपणे स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या सिंधुताई सपकाळ, अपर्णाताई रामतीर्थकर, मेधा पाटकर, रेणू गावसकर, रेणू दांडेकर, राणी बंग, साधनाताई आमटे, मंदाकिनी आमटे, भारती आमटे, स्मिता कोल्हे यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली व वाढवली आहे. राजमाता अहिल्यादेवी, रजिया सुलताना, महाराणी ताराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चन्नमा या सारख्या महिलांनी तर पराक्रमाची सर्व क्षेत्रे गाजवून मोठा इतिहास रचला आहे. या राज्यकर्त्या स्त्रियांनी राजपदे भूषविली. त्याचबरोबर राजपदांचा सन्मान शतपटीनी वाढवला. गोदावरीबाई टेके यांच्यासारख्या विरांगणानी राज्य पद भूषवले नसले तरीसुध्दा त्यांच्या पराक्रमाची नोंद इतिहासाला घेणे भाग पडतेच. भारतातील बरेच महापुरुष घडवण्यामागील महिलांची भूमिका नेत्रदीपक आहे. यामध्ये शिवछत्रपतींच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळे महाराष्ट्राला कितीतरी गोष्टी प्राप्त झाल्या. त्यांनी महाराष्ट्रातील पहिली सहकारी बँक उभी केली. त्याचे नाव स्वराज्य. या स्वराज्यात शेतकऱ्यांना बी-बियाणांसाठी पैसे पुरवले जात असत. महाभारतावरील मराठीतील सर्वोत्तम भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी लिहणारे ज्ञानेश्वर जेव्हा हतबध्द होऊन बसले होते तेव्हा त्यांना उर्जा देण्यासाठी ताटीचे अभंग रचणारी मुक्ताई म्हणजे ज्ञानाचा उजेडच होय. याच मुक्ताईला वयाच्या दहाव्या वर्षी चांगदेवासारख्या योग्यानेही गुरु मानले. तुकारामाला साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी जिजाऊ यांचा उल्लेख करावाच लागेल. नामदेवाच्या घरचे दास्यत्व पत्करुन असलेल्या जनाबाईने संतसाहित्यात नव्या प्रवाहाची भर घातली. चक्रधराच्या कितीतरी शिष्या ह्या महिला होत्या. सानेगुरुजी व विनोबा सारखी मातृहृदयी माणसे घडवण्यात त्यांच्या मातांचे योगदान क्षणभरासाठीसुध्दा नाकारता येत नाही. यशवंतरावांच्या पाठिशी सदैव उभा असणाऱ्या वेणूताईंनी यशवतरावांसारख्या सह्याद्री पर्वताला किती बळ दिले याची गणती करता येणे शक्य नाही. कल्पना चावला व सुनिता विल्यम्स सारख्या महिलांनी अंतराळ क्षेत्र सुध्दा आपण गाजवू शकतो याची थोर प्रचितीच दिली. नीरजा भानोत ने केलेला पराक्रम सुध्दा अतुलनीय ठरतो. किरण बेदी, नीला सत्यनारायण व आयपीएस दुर्गाशक्ती सारख्या महिलांनी पोलिस व प्रशासन क्षेत्रातील अधिसत्ता काबीज करुन दाखवली. सुरेखा यादव च्या रुपाने रेल्वेला महिला मोटरवुमन मिळाली. नंतर ही परंपरा आजवर वाढत चालली आहे. पी.टी.उषा पासून सुरवात झालेल्या खेळातील प्रगतीला उत्तरोत्तर वाढवण्याचे काम कर्णम मल्लेश्वरी, मेरी कोम, अंजू बॉबी जॉर्ज, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, मिथाली राज, प्रार्थना ठोंबरे, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, कविता राऊत, ललिता बाबर, साक्षी मलिक, पोगट भगिनी या सारख्या असंख्य खेळाडूंनी भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली. नारायण मूर्तींना इन्फोसिस उभा करताना सुरवातीला साथ देणाऱ्या सुधा मुर्ती, पेप्सीकोच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या इंद्रा नुयी, आयसीआयसीआय या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या चंदा कोचर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य या सर्व महिलांनी उद्योगक्षेत्रातसुध्दा आपण कुठेही कमी नाही आहोत हे दाखवून दिले. बचेंद्री पाल, अरुणिम्मा सिन्हा, कृष्णा पाटील यांच्या सारख्या धाडसी एव्हरेस्ट विरांगणा तसेच आरती शहा व रुपाली रेपाळे सारख्या जलतरणात पारंगत असणाऱ्या कित्येक खाड्या पोहून पार करणाऱ्या महिलांनी साहसाच्या सर्व कक्षांना कवेत घेतले. साहित्याच्या क्षेत्रात कुसुमावती देशपांडे, लक्ष्मीबाई टिळक, शांता शेळके, बहिणाबाई, पद्मा गोळे, महादेवी वर्मा यांच्यासारख्या महिलांनी दिलेले योगदान गौरवास्पद आहे. चित्रपट, कला, अभिनय, नाटक, संगीत, गीत, संशोधन, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडते. आता मला थोड्याशा वेगळ्या पध्दतीने हे सर्व पुढे घेऊन जायचे आहे. महिला पराक्रमी आहेत, सक्षम आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करु शकतात. काही प्रसंगी पुरुषाहूनही उत्तम कामगिरी पार पाडतात. यात शेकडो मुद्द्यांची भर घालता येईल. मात्र मला एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे. हे पराक्रम फार मोठे आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. यांची शृंखला अबाधित पणे पुढे नेण्याचे सामर्थ्य 21 व्या शतकातील महिलांना पेलायचे आहे. साधारणतः समाजात 50 टक्के महिला व तेवढेच पुरुष असताना यशस्वी महिलांचे प्रमाण केवळ 10-12 टक्के असणे म्हणजे कार्य करायला अजून फार मोठा वाव आहे. काही आकड्यावरुन आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी या पुढीलप्रमाणे आहेत. मुद्रा कर्ज मागायला जाणाऱ्या एकूण अर्जसंख्येतील महिलांच्या अर्जाचे प्रमाण केवळ 5-13 टक्के एवढेच आहे. म्हणजे व्यवसायात महिलांचा टक्का वाढणे गरजेचे आहे. तसेच सर्व क्षेत्रात महिलांचा टक्का वाढणे गरजेचे आहे. जगातील सर्वात जास्त युवा लोकसंख्या भारतात असेल तर जगातील सर्वात जास्त कार्यक्षम तरुणीसुध्दा भारतातच आहेत. त्यांना इथल्या तरुणांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिध्द करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तेव्हा कोणतेही क्षेत्र वर्ज्य न मानता अगदी सर्व क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढवणे ही तुमची माझी व समाजाची नैतिक गरज त्याचबरोबर जबाबदारी सुध्दा आहे. वरील सर्व उदाहरणांवरुन महिला सर्व काही करु शकतात हे सिध्द होतेच. मात्र मूठभर महिलांनी पराक्रम करणे व बाकीच्या महिलांनी चूल-मूल यात गुरफटणे योग्य होणार नाही. हे सगळे होत असताना स्त्री पुरुष समन्वयाला कुठेही धक्का लागता कामा नये याची जाण महिला व पुरुष या दोन्ही समाजघटकांनी बाळगणे गरजेचे आहे. या लेखामध्ये महिला व पुरुष यांची स्पर्धा लावण्याचा कोणताही विचार पेरला गेलेला नाही. स्त्री पुरुष हे एकमेकांचे स्पर्धक नसून ते एकमेकांचे पुरक आहेत. एवढी जाणीव ठेवत वेगवान वाढणाऱ्या भारताच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी माझ्या सर्व भगिनी सज्ज होतील या विश्वासावर हा लेख पूर्ण करतो. सर्व महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने भावी वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा!!! - अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती.
Suhel - शुक्रवार, ३ मार्च, २०१७
Khupach marmik pan tevdyach vichar karayal udyukat karnarya tippanya aaget. Khupach chhan!
प्रमोद तावडे - मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७
आपल्या राजाची काळ्या लक्ष्मीचा वध करून देशाच्या इतिहासात अजरामर होण्याची लहर प्रजाजनांना फारच महागात पडली. ‘स्वामिनिष्ठा’ आणि ‘देशप्रेम’ या पवित्र मूल्यांसाठी त्यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांना स्मरून, प्रसंगी प्राणार्पण करून आपल्या देशभक्तीचे अग्निदिव्य यशस्वीपणे पार पाडले. पुढे काय ? निवडणुकीच्या राजकारणात कृष्णवर्णीय लक्ष्मीमातेच्या कृपाप्रसादाचे वाटप बंद झाले का ?
Yogesh Raut - सोमवार , २० फेब्रुवारी, २०१७
Perfect selection
Vijay Mdshingikar - बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७
मस्त.....खूप छान 'बिगूल'....खूप खूप शुभेच्छा
ओंकार शिराळकर - गुरुवार, २६ जानेवारी , २०१७
अप्रतिम सदर आहे. निवडलेल्या सगळ्याच पोस्ट अतिशय मार्मिक आहेत. यातील बरेच मान्यवर मित्रयादीत असून देखील यातील बऱ्याच पोस्ट्स फेबुवर दिसल्या नव्हत्या त्या वाचता आल्या.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर