रामशास्त्र्यांच्या बंडामुळे भूकंप
शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८ बिगुल न्यूज नेटवर्क

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्य पद्धतीने काम करीत नसल्याचा आरोप केला.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासन योग्य पद्धतीने काम करीत नसल्याचा आरोप केला. सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने योग्य रितीने काम केले नाही तर लोकशाही धोक्यात येईल, अशी भीती या चार न्यायमूर्तींनी व्यक्त केली. आधुनिक पेशवाईत रामशास्त्र्यांचे बंड, अशा शब्दात या घटनेचे वर्णन करण्यात येत आहे. या चार न्यायमूर्तींनी एक सात पानी पत्र सरन्यायाधीशांना सादर केले असून त्याचे वाचन पत्रकारपरिषदेत केले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यासह पत्रकारपरिषद घेतली. या अत्यंत नाट्यमय घटनेमुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अक्षरशः भूकंप झाला. दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीबाबत चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी जाहीरपणे अविश्वास व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांचे आभार मानून चारही न्यायमूर्ती म्हणाले, कोणत्याही देशाच्या कायद्याच्या इतिहासात हा फार मोठा दिवस आहे आणि ही अभूतपूर्व घटना आहे. ही पत्रकारपरिषद घेण्यावाचून आमच्यापुढे पर्याय उरला नाही. ही पत्रकारपरिषद आम्ही अशासाठी घेतोय की, आम्ही आत्मा विकल्याचा आरोप आमच्यावर होऊ नये.

न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात घडू नयेत, अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. आम्हाला वाटले की सर्वोच्च न्यायालय आणि देशाच्याप्रती आमचे उत्तरदायित्व आहे. म्हणून आम्ही सरन्यायाधीश यांनी पावले उचलावीत यासाठी प्रयत्न केले. त्यांना पत्रही लिहिले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायमूर्तींनीही सरन्यायाधीशांना आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात अनेकदा विनंती केली, परंतु सर्व प्रयत्न विफल ठरले.

या चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना जे पत्र लिहिले आहे, त्या पत्रातील प्रमुख मुद्दे असे –

१)महत्त्वाच्या प्रकरणांसंदर्भातील निर्णस सामुदायिकरित्या घेण्याच्या परंपरेचे उल्लंघन सरन्यायाधीशांकडून होत आहे. २)सरन्यायाधीश खटल्यांचे वाटप करण्यासंदर्भातील नियमांचे पालन करीत नाहीत. ३)सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेसंदर्भातील महत्त्वाची प्रकरणे सरन्यायाधीश कोणत्याही कारणांशिवाय आपल्या मर्जीतल्या खंडपीठांकडे सोपवतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. ४) सर्वोच्च न्यायालयात निश्चित केलेल्या ३१ पदांपैकी २५च पदावर आहेत, सहा पदे रिक्त आहेत.प्रतिक्रिया द्या2290 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
विश्वास माटे - शनिवार, १३ जानेवारी , २०१८
jantech vishwasniy sthan dagmaglya sarkh vatate aahe, kharach asala kahi prakar sarvochha nyayalayat suru aasel tar tyachhi tapasni vhayla pahije..... ha khup sanvedanshil mudda aahe.... aani tya char nyaymurtina hi salam ki tyanni he ughadkis aananyacha prayatna kela
Rohidas - शुक्रवार, १२ जानेवारी , २०१८
घाणेरडे राजकारण आता न्यायधिशही खेळतात असे म्हणायचे का ? न्यायमूर्ती चेलमेश्वरने सकाळी आरोप केले व दुपारी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांची भेट घेतली...यावरून यांचा बोलविता धनी कोण आहे याचा अंदाज बांधता येईल का ?

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर