मोदींना पर्याय काय?
शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७ संदीप डांगे

मोदी सरकारचं अपयश स्वच्छ दिसू लागल्यानंतर आता 'मोदींना पर्याय काय' हा प्रश्न चहूबाजूंनी आदळला जात आहे. ही विचार करून रचलेली योजना आहे हे जनतेला कळायला हवं.

हा प्रश्न नोटबंदीचे अपयश ध्यानात यायला लागले तेव्हापासून जास्तच पिंगा घालू लागला आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत, जेव्हा लोक हालअपेष्टा भोगून कंटाळली होती आणि सगळ्या जुमल्यांचे इमले कोसळू लागले होते. तेव्हा सामान्य नागरिकाच्या मनात चलबिचल व्हायला लागली. "नियत तो देखो, वो तो साफ हैं ना" हा बचावही साधारण तोकडा पडायला लागला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलची लार्जर दॅन लाइफ इमेज थरथरू लागली. तेव्हा '....हो, पण मोदींना पर्याय काय?" हा चलाख प्रश्न मुसळधार पावसासारखा कोसळायला लागला. ह्यामागे फार विचार करून तयार केलेली योजना आहे. हा एक वेल-प्लॅन्ड प्रोपगंडा आहे.

ह्याच्या थोडं मुळाशी जाऊयात. मोदींनी शपथ घेतल्यावर संपूर्ण एक वर्ष अप्रतिम धुंदीचे वातावरण होते. वर्षाचा लेखाजोखा आल्यावर एक एक बुरूज ढासळायला लागले. ह्याचे कारण होते दिलेली सर्व आश्वासने, 'ही दिलीच नाहीत, तुम्हीच चुकीचे समजलात, आम्ही असे बोललोच नाही, असे कुठे असते का, ते अगदी निवडणुकांत असं बोलायलाच लागतं' इथवर चाललेला माजोरडेपणा. त्याच सुमारास 'तुमचं मत परत मोदींनाच द्याल का?' असा प्रश्न विचारत उत्तरात 'येस नो टाइप करा' छाप प्रचार/जनमत चाचपणी सुरू होती. साधारण २०१५ च्या उत्तरार्धात असे लक्षात आले की लोक भाजपला कंटाळतायत. कारण अगडबंब वचनं दिली, तसे आता डिलिवर होऊ शकत नाहीये. २०१९ ची तयारी तर करायचीच. मोदींची जी कोणी टीम असेल, त्यांनी हा प्रश्न जन्माला घातला. लोक जेव्हा पर्याय शोधू लागतात तेव्हा जो प्रश्न कोणताही मार्केटींगवाला, अगदी साडीच्या दुकानातला सेल्समनही विचारेल तो प्रश्न विचारला जाऊ लागला. 'म्याडम, आपको इससे ज्यादा सुंदर साडी पुरे सुरत में नही मिलेगी, जाओ, ढुंढके लाओ, डब्बल पैसा दूंगा"

तसाच प्रश्न ..... "मोदींना पर्याय काय?"

म्हणजे मोदींना पर्यायच नाही. पर्याय शोधूच नका. गरजच नाही. सामान्य नागरिक या प्रश्नाच्या पलिकडे नाही बघू शकत. गेल्या दहा वर्षात सूत्रबद्ध त-हेने, कोट्यवधी रुपये ओतत जे चित्र उभे केले आहे, त्याला तोड देऊ शकेल असे कोणीतरी आहे का राजकारणात? नाहीच. अगदी भाजपातही नाही. खुद्द भाजपही नाही.

विरोधी पक्ष २०१०पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. काँग्रेस तर खूपच सुस्त झाली. आधी धोरणं ठरवणं, निर्णय घेण्यात बरीच धांदल सुरू होती, त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा २०११ पासून जो अंधाधुंद गोळीबार सुरू झाला, त्यात पुरती संपली. त्यांची रिकवरी शक्यच नाही. तेव्हाच मोदींचा उदय फोटोशॉप-विकासाच्या मदतीने, २००२च्या पुण्याईने आस्तेकदम सुरु होता. मोदींनी आपला ब्रॅण्ड स्थापित केला. ही एक प्रोफेशनल पद्धत आहे जी आजवर कोणीही वापरली नाही.

पण प्रथम-स्थापित ब्रँडचीही एक गम्मत असते. कोलगेटला पर्याय नाही, बिसलेरीला पर्याय नाही, झेरॉक्सला पर्याय नाही, अॅक्वागार्डला पर्याय नाही. पण असे असते का? नाही. वरील सर्वांचे सक्षम किंबहुना अधिक भारी पर्याय आहेत.

आता मोदींना परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करून जिंकले. 'मोदींना पर्याय नाही' हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते भारतात आहेत. त्यांनी स्वतःची प्रतिमा कधी निर्माण केली नाही. प्रतिमा निर्माण करावी लागतेच. आजच्या जमान्यात आपोआप कुणीही प्रसिद्ध होत नाही. मोदींच्या वकुबाचा गेल्या साडेतीन वर्षात एव्हाना पूर्ण अंदाज आलेला आहे. असेच सरकार चालवायचे असेल तर कुणीही चालवेल. कुणीही चालवेल तर मग काय कुणीही चालेल. हां, मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच किंवा पुढच्या २० वर्षातही फरक पडणार नाही.

'देशाच्या विकासाचे व्हिजन जे मोदींकडे आहे ते कुणाकडेच नाही, जी धमक ते व्हिजन राबवायची आहे ती कुणाकडेच नाही', इत्यादी कंड्या पिकवल्या गेल्या आहेत. याचे कारण भारताबद्दल, स्वतःच्या देशाच्या इतिहासाबद्दल धड अभ्यास नसलेल्या तरुणांनी हा बहुतांश देश भरलेला आहे. काँग्रेसने देशाची वाट लावली ह्या बाळकडूत न्हायलेले हे तरुण कितीसा अभ्यास करतात हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. यांना 'तुम्ही द्रारिद्र्यात आहात कारण काँग्रेसने तुम्हाला तसेच ठेवले, आता प्रगती फक्त मोदीच करु शकतात' असे २०१२ पासून भरवले गेले आहे.

हे सर्व लोक देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे, मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे १९४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. (खरेतर ते तेव्हा वेगळंच काही मागत होते व त्याचसाठी त्यांचे प्रयत्न निरंतर चालू आहेत) तरी आजवर स्वतंत्र भारतावर कोणत्याही पक्षाच्या सरकारने राज्य केलेले असू देत, पण एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल आणि प्रचंड विविधता असलेला देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पदच आहे. यात 'सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे' योगदान आहे. आपल्या देशात आजकाल नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की स्वतंत्र झाल्यावर अमुक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण त्याचवेळी अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकांचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुस-यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या झटपट विकासाचे दाखले देणार्‍यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराच्या क्षेत्रफळाएवढे देश विकसित झाले, त्याचेच तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही अभ्यासून बघा. इथे मी काँग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. काँग्रेस असो वा भाजप, प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. पण मुद्दा हा आहे की गेल्या ७० वर्षांत आपण सर्वच राजकीय पक्षांचे अनेक लायक, नालायक, तेजस्वी ते तेजहीन, बुद्धीमान ते बुद्धीहीन, घराणेबाज ते आगंतुक, कर्तृत्ववान ते कर्तृत्वहीन असे सर्व प्रकारचे नेते सर्व पदांवर पाहिले आहेत. आजवर हा प्रश्न निर्माण झालाच नाही की ह्याला पर्याय काय, त्याला पर्याय काय?

त्याचे कारण असे की भलेही आपला समाज व्यक्तिपूजक असला, महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणारा असला, भोंदूंचा भक्त असला तरी तो कायम स्वतःचा विकास पाहत असतो. 'मला काय फायदा?' ह्या प्रश्नावर आपली निवड करत असतो. अशा निवडीतूनच आपण आज जगातल्या दुस-या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेऊ शकलो. कारण आपण कोणा एकाच्या भरवशावर राहिलोच नाही. आपल्याला गरजही नव्हती कधी. म्हणून आपण यशस्वी झालो. आपल्या सर्व आशाआकांक्षा, स्वप्ने, इच्छा जर एकाच व्यक्तीच्या पायी समर्पित केल्या तर अधोगतीशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. 'मोदींनी केले ते योग्यच केले असेल, आता लोकच असे निघाले त्याला ते काय करणार' ही जी मानसिकता आहे ती एक देश म्हणून, समाज म्हणून घातक आहे. नेता चुकतो, तो देव नाही हे समजण्याची कुवत आपला समाज गमावतो आहे. तो चुकला तरी तो चुकला नाहीच हे बळजबरी डोळे वटारून सांगणारी यंत्रणा आपल्या आजूबाजूला तयार होत आहे ती घातक आहे. मोदींना पर्याय काय? हा प्रश्नही प्रेमाने नाही तर डोळे वटारून विचारलेला आहे हे लक्षात घ्या. "मला काय फायदा?" ह्या विकासवादी प्रश्नापासून आपण "मोदींना पर्याय काय?" ह्या निरर्थक प्रश्नाकडे ढकलले जात आहोत.

त्यापेक्षा पुढील प्रश्न विचारा. मोदींना ज्यासाठी निवडून दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोणती कामे सुरू आहेत? ह्या सर्व प्रश्नांबद्दल तिस-याच घटकाकडून जागरुकतेने प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस व इतर भाजपविरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भाजपआयटीसेल व विकलेला मीडिया यांनी अविश्वासार्ह आणि मतलबी अशी करून ठेवली आहे. ते असतील किंवा नसतील पण भाजप फार धुतल्या तांदळाचा आहे असे तर नाही.

भारतात राजकीय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल? ते त्यांनी करूही नये. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल का नाही याबद्दल आज साशंकता निर्माण झाली आहे. तरी काहीही लांड्यालबड्या करून जिंकलेच तर कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. हां, त्यानंतर मात्र भारत कसा असेल हे मात्र माहीत नाही.

मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणि माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरून लांडग्याची दिसायला लागली आहे. तरी लोकांना समजणार नाही. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदूंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदूंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत ख-या विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही.

मोदींना पर्याय काय हा वरवर सोपा वाटणार प्रश्न फार गुंतातुंतीचा व गोल गोल घुमवून परत त्याच ठिकाणी आणणा-या चकव्यासारखा आहे. त्या चकव्यालाच एक प्रश्न तुम्ही विचारा.... "पण मोदींना पर्याय का शोधायचा?" मग बघा.

एक सामान्य नागरिक म्हणून आपण आपला फोकस केवळ यावर ठेवावा की भाजप जिंको वा कोणीही, भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे. 'मला काय फायदा?' या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.

 प्रतिक्रिया द्या2724 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Kolsat - बुधवार, ३१ जानेवारी , २०१८
Crrently there is noleader who has a national profile. Rahl Gandhi has lost many elections. I am sre the people know that bringing good days will take more than five years. People also see that Modi is working hard to make a difference. People know that at least no member of Modi Government has been accsed of taking bribes a great improvement over the past governments. Finally it seems to me that the athor himself does not know the answer to the qestion he has posed.
Uday Wani - गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
Chhan lekh...tari joparyant sanghache ghanerade rajkaran chalu rahil toparyant modinna paryay mhanun ekhada swaccha pratimecha manus ubha karane kathin hoil.
नकुल - मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
इतकी गरळ ओकून पण मुख्य मुद्द्याचे स्पष्टीकरण किंवा उत्तर तुमच्याकडे पण नाही साहेब। आणि 2019 मध्ये जर मोदींना पर्याय राहुल गांधी किंवा केजरीवाल असतील, तर आम्ही मंदबुद्धी किंवा काय काय म्हणून घेऊ तुमच्याकडून पण मत मोदींनाच देणार। जेव्हा मोदींच्या समर्थकांना उद्देशून लिहता तेव्हा थोडे शब्द जपून वापरा। कारण जितके वाईट शब्द तुम्ही वापरलं तितकी ह्या लेखातील धार निघून जाईल। आणि बोथट लेख वाचण्यात काही मजा नाही
अतुल कुलकर्णी - मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
लोकशाही मधे 'व्यक्ती' ला पर्याय शोधणं हेच मुळात चूक आहे. पक्षाचं महत्व कमी करून टाकणं हे आपल्या सारख्या इतक्या diverse देशात अत्यंत धोकादायक आहे. असे लेख लिहून 'व्यक्ती विरुध्द व्यक्ती' अशा तऱ्हेचं वातावरण करणं हे उलट मोदी , संघ ( जिचा मुळात एकाधिकारशाही वर विश्वास आहे) ह्यांच्या strategy ला बळी पडणं आहे. त्यांना तेच तर हवं आहे- Personality Centric politics. आणि मग अध्यक्षीय पद्धत. मोदी , शहांनी सगळ्यात आधी भाजपा 'ताब्यात' घेतला तो ह्याच साठी. मोदींना प्रत्यक्ष मत ( direct voting) ५४३ पैकी फक्तं एकाच मतदार संघातली माणसं देऊ शकतात. म्हंजे इतर ५४२ मतदार संघं इतर खासदारांना निवडून देतात. आणि मग त्यातले खासदार पंतप्रधान निवडून देतात हे विसरूया नको..... आज ह्या घडीला देखील जनता किंवा विरोधी पक्ष नव्हे तर भाजपाचे खासदारच technically मोदींना हटवू शकतात. पण २७९ जणांची मिळूनही तशी हिम्मत नाही. कधीच नसेल ; हे कशाचं लक्षण आहे??? तशिही भाजपला ३३% मतं मिळालेत. ५१% नव्हे ! म्हंजे ६७% लोकांना तो नको आहे !! ह्या सगळ्याकडे लक्ष वेधून भारताला परत एकदा 'पक्षीय लोकशाही' ची आठवण करून द्यायला हवी आहे. असे लेख लिहून 'अध्यक्षीय लोकशाही' कडे ढकलण्याची नाही. तेंव्हा शहाण्यांनी ह्या व्यक्तीवादाला बळी नं पडता 'मोदींना पर्याय नव्हे तर भाजपला पर्याय' अशी भूमिका घ्यायला हवी. लेखाचा उद्देश मी अगदीच समजू शकतो. त्या बद्दल अजिबातच शंका नाही. पण हा लेख नकळतपणे 'trap' मधे अडकून एका larger agenda ला मदत करतो आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं...
Girish Tambolkar - मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
This thinking is totally wrong in congress regime what developement congres did absolutely nothing they have given us gifts of kashmir issue lost thousands of sq km land to china Kashmiri pandit become refugee in their own land and as you said 3 years is very limited time to see what's happening No other powerful leader than Narendra Modi at this stage
Vijay D. Somvanshi - मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७
Farmer's young educated son's
आशिष पवार - सोमवार , १८ सप्टेंबर, २०१७
काँग्रेस ने घराणेशाही सोडून आता युवा पिढीला नेतृत्व दिले पाहिजे. जोतिरादीत्य सिधिंया, सचिन पायलट सारख्याना नेतृत्वाची संधी दिली पाहिजे. मनमोहन सिंग यांच कर्तृत्व आता सगळ्याना कळुन चुकलेल आहे. तेच एकमेव पर्याय दिसत आहेत.
कुणाल शेळके - सोमवार , १८ सप्टेंबर, २०१७
मोदींना पर्याय काँग्रेस हा आहे!
वैभव रोडी - सोमवार , १८ सप्टेंबर, २०१७
परखड विचार आहेत, या अशाच धारदार विचारांची गरज आहे. बाकी पुढे पाहुयात काय होतय ते, पण एक मात्र खर आहे भाजपचे तीन वर्षात तेरा वाजलेत.
Kunal Manusmare - रविवार, १७ सप्टेंबर, २०१७
कॉलेज ला गेलेल्या तरुणाला बापानी कार घेऊन द्यावी.. कमीतकमी भारीतली बाईक तरी घेऊन द्यावी, मजबूत पॉकेट मनी द्यावा, कुठे आला गेला विचारू नये असं बरंच काही वाटत असतं.. पण बापाची आर्थिक परिस्थिती काय.. डोक्यावर किती कर्ज आहे.. धाकट्या पोरीच्या लग्नाच्या खर्चाची काही व्यवस्था आहे का? बापाच्या दुकानाच्या बाजूला नवीन दुकान उगडलंय.. धंद्या ला पैशाची जरूरत आहे.. अश्या बऱ्याच गोष्टीवर बापाची कसरत चालू असते.. आता हे सगळे पोरगा समजू शकला तर ठीक नाहीतर टपरीवर उभा राहून सिगरेट फुकत आमच्या बापाला काही कळत नाही अस म्हंटल की झालं.. आता निवडणुकी आधी आश्वासन का दिली.. जर मोदी सत्तेत आले नसते तर परत कुबड्याचं सरकार आल असतं.. 2005 - 2014 गाढवांचा नांगर तर फिरला होता.. या पांच वर्षात काई झालं असतं याचा विचार ही करवत नाही.. दरम्यान मोदींनी किती कष्ट केलेत हे डोळ्यावर चष्मा नसलेल्या, अभ्यासू व्यक्तीलाच कळू शकेल.. आता ओरडा.. भक्त... म्हणजे आपण मूर्ख असाल तरी विद्वान म्हणून मिरवू शकाल..
Kunal Manusmare - रविवार, १७ सप्टेंबर, २०१७
3 वर्षाच मोदींच अपयश आपण स्वच्छ पाहू शकतात आणि मोदी नव्हते म्हणून देशाच 60 वर्ष काई बिघडलं नाही.. स्वछ आहे आपली नजर.. छापणार असाल तर सांगा.. लिहून पाठवतो.. ६० वर्षात न झालेल्या पण मागच्या 3 वर्षात मार्गी लागलेल्या कामाची यादी.. आपण करा मार्केटिंग ची तयारी पण नेतृत्व म्हणजे कोलगेट नव्हे.. मार्केटिंग केलं की झालं काम.. प्रॉडक्ट दमदार असावं लागतं.. जे मोठया तपश्चर्या शिवाय तयार होऊ शकत नाही.. पर्याय नक्कीच शोधा.. पण म्हणून स्वतःच करिअर चमकवण्यासाठी सूर्यावर चिखलफेक कशाला करता!? आता भक्त म्हणून मला दूषणे द्यायला सुरुवात होईल.. द्या.. कारण समोरच्याला भक्त म्हणलं की विद्वानांच्या खुर्चीत सहज बसता येत..
अनंत पाचडे - रविवार, १७ सप्टेंबर, २०१७
का नाही? आज ही लालकृष्ण आडवाणी जी किंवा सुषमा स्वराज यांना पंतप्रधान बनवा, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा ही मंडळी महत्वाच्या खात्यांवर आली की 2 ते 3 महिन्यात च फरक दिसून येईल
Parikshit - रविवार, १७ सप्टेंबर, २०१७
Bro you seem to be all confused
Shriram shintre - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
No benefit
Hrishikesh - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
यात एक गोष्ट राहिलीच आधी कोणी कांय केलय?
मोतीराम महादू भावनाथ - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
आम्ही समजलो होतो वाघ पण वाघाचे कातडी पांघरलेले अस्वसल निघाले निवडणुकी पूर्वी शेतकरी, शेतमजूर, कामगार, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि लघु उद्योजक यांना मोठं मोठी आश्वासन देण्यात आली. सत्तेत आल्यानंतर त्याला चुनावी जुमला असं गोंडस नाव दिलं काँग्रेस पेक्षाही लबाड ढोंगी, भ्रष्टाचारी सरकार आहे सीमेवरील तणाव यांच्याच कार्यकाळात जास्त वाढले आणि सैनिक देखील यांच्याच काळात जास्त शाहिद झाले सर्जिकल स्ट्राईक करून ४-५ पाकडे मारले आणि त्याच श्रेय घेत सुटले हे माजूरडे पण पाकिस्तान प्रेरित किती आतंकवाद्यांनी भारतात येऊन शेकडो जवानांचे प्राण घेतले त्याबाबत ५६ इंच छातीवाले आणि त्यांचे माजूरडे भक्त काहीही बोलत नाहीत. सत्तेचा उन्माद यांना इतका चढला आहे की यांना वाटतं आपल्या सारख कुणीच नाही बुलेट ट्रेनच्या नावाखाली ८० हजार कोटींचा चुराडा होणार त्यात देखील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणार बुलेट ट्रेनने सामान्य माणूस प्रवास करू शकतो काय? याचे उत्तर नाही असंच आहे. विमान आणि बुलेट ट्रेनच भाडे सारखेच राहणार असेल तर कशाला हवीय बुलेट ट्रेन त्या पेक्षा मेक इंडिया अंतर्गत देशातच प्रवासी विमाने बनवा . कारण दोन्हींचा प्रवाशी वर्ग एकच आहे. इथे १०० च्या स्पीडने धावणारी रेल्वे महिन्याला ४ वेळा कोलांटउड्या खाऊन शेकडो लोकांचा जीव घेते. तिथं बुलेटच्या वेगाने धावणारी रेल्वे किती कोलांटउड्या खाईल आणि किती निष्पापांचा बळी घेईल हे देवच जाणो. 2019 ला पंतप्रधान तर मोदीजीच झाले पाहिजे. पण ते प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन. तेव्हांच त्यांची माजुरडी पिलावळ औकातीत राहील. आज काय झालं आहे मोदी आणि कंपू विरोधी पक्षांना जेल मध्ये टाकण्याची धमकी देऊन आपल्या पक्षात ओढत आहे. आणि भ्रष्टाचार्यांना संरक्षण देत आहे. सत्तेत असतांना नको ते उद्योग करून संपत्ती कमविलेली मंडळी साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी भाजपा च्या वळचणीला जात आहेत. हि काही भाजपची पक्ष वाढ नाही तर ती आलेली एक प्रकारची सूज आहे. हि सूज केव्हा उतरावयाची हे मतदारांनी ठरवून टाकलं आहे. त्यामुळे २०१९ ला ३५० कमळ फुलणार नसून त्यातील १५० - १६० कोंमेजून जातील. आता असलेल्या कमळांपैकी जवळपास ५० कोमेजले आहेत.
Sagar Auti - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
Sir you are right. This is very good and correct article.
Machhi - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
एकदा का मजबुत सरकार स्थापन झाले, मग ते कोणाचेही असो ते त्यांचा षडयंञानेच कारभार करणार, तेथे सर्वसामान्य जनतेचा भावना अपेक्षा मतं या धुळीत मिसळल्या तरी राज्यकर्ते वाहत्या गंगेत हात धुऊन घेणारच. 5 वर्षे ते जे करतील तेच श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करणार
राहुल भोसले - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
खूप छान लेख मूळ प्रश्नालाच आपण हाथ घातला आहे. भारताचा विकास 2014 नंतरच होतोय वा झाला असे जे भासवणाच्या प्रयत्न केले जातोय तो चुकीचा आहे .विकास आम्हीच केला हे म्हणायचा अधिकार कोणालाच नाही,कारण विकासाचे खरे स्तंभ म्हणजे या देशातले जनता आहे , त्यात जनतेचे योगदान फार मोठे आहे .
मनोहर अहिरराव - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
अरविंद केजरीवाल हाच सरवात मोठा परयाय आहे जरी भाजपाने तयाना कितीही बदनाम केले असेल..
Nitin choramale - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
लोकांनों....आता तरी जागे व्हा..!!
Parag Vartak - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
छान लिहिलेत ! हीच वेळ आहे लोकांना जागे करण्याची but who will do that's main question
सतीश गिराम - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
खूप छान ,म्हणजे आपण विचारी मतदार झालो पाहिजे हि गोष्ट खूप अवडलि ,खोटा प्रचार करने लोकांना वेड्यात काढणे थांबले पगिजे मतदार जागा आणि अभ्यासू झाला पाहिजे.
Prabhakar Kambale - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
Balanced & correct analysis. Sharing for friends.
Milind Chavan - शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७
Very good writing
अपूर्व ओक - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
वा डांगे अण्णा
Digsmbar Naik - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
Kejriwal ha ek paryay hou shakto
शान्ताराम मंजुरे - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
प्रतिक्रिया देणे शक्य ोत नाही कारण काही अक्षरे उठत नाहीत.
Manoj - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
Ekdam Mast lekh...correct timing...Very good...
Sunil Barge - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
छान लिहिलेत ! हीच वेळ आहे लोकांना जागे करण्याची
Praveen Brahme - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
Apt and correct analysis! This introspection is needed.
Anjali - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
Masta lekh
ऊत्तमकूमार जैन - शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७
एकदम सही ...!माचकर सरांच्या पोस्टवर आपण म्हणता तसे ऊन्मादी भक्त पिसाळले सूध्दा

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर