श्रीदेवीचा नाकाबंदी आणि फ्लॉप नोटाबंदी
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७ रवीश कुमार

केंद्र सरकारने प्रचंड गाजावाजासह जाहीर केलेली नोटाबंदी पूर्णपणे फसली आहे. सरकार मान्य करो अथवा न करो रिझर्व्ह बँकेने २०१७ जूनअखेरीस जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे. 

श्रीदेवीच्या नाकाबंदी सिनेमाप्रमाणं नोटबंदी फ्लॉप झाली. आतापर्यंतचे सारे संकेत तसेच आहेत, पण तसं स्पष्ट बोलण्याचं धाडस आजवर कुणी गोळा करू शकलेलं नाही. रिझर्व्ह बँकेकडं किती नोटा परत आल्या, हे हार्डवर्कवाले अजून सांगू शकलेले नाहीत. हे अशासाठी माहीत होणं आवश्यक आहे की, १५-१६ लाख कोटींच्या नोटा चलनात होत्या, असं सरकारनं कोर्टातही सांगितलंय. पाचशे-हजाराच्या नोटा बंद झाल्यामुळं दहा-अकरा लाखच परत येतील. बाकी चार-पाच लाख कोटी नष्ट होती आणि तेवढा सरकारला नफा होईल, कारण आरबीआय तेवढे पैसे परत देते. आतापर्यंत रिझर्व्ह बँक नोटा मोजू शकलेली नाही आणि आता ती अपेक्षाही बाळगू नये. कारण मूळ गोष्ट प्रपोगंडा करूनच लोकांपर्यंत पोहोचवलीय की नोटबंदी यशस्वी झाली. ती कशी झाली वगैरेंशी कुणाला देणंघेणं नाही.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांनी सांगितलं की, नोटाबंदीनंतर २९ राज्यांमधून केवळ ११.२३ कोटी मूल्याच्या बनावट नोटा प्राप्त झाल्या.

रिझर्व्ह बँकेने जून २०१७ मध्ये संपलेल्या आपल्या वार्षिक जमा-खर्चानंतर केंद्रसरकारला ३०,६५०कोटींचा सरप्लस परत केलाय. ही रक्कम यावेळच्या अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा खूप कमी आहे.

बजेटचा अंदाज होता की रिझर्व्ह बँकेकडून ७५ हजार कोटी मिळतील, परंतु त्याच्या निम्म्याहून कमीच मिळाले. हे असं का झालं याचं कारण सांगितलं? असं वाटतं की रिझर्व्ह बँक आपल्याकडूनच अपेक्षा बाळगत असावी की, समजून घ्या. बोलायलाच कशाला पाहिजे.

२०१५-१६ मध्ये रिझर्व्ह बँकेने ६५,८७६ कोटी परत केले होते. २०१५-१५मध्ये ६५,८९६ कोटी. तीन वर्षांनंतर ही रक्कम अर्ध्यावर आली.

यावेळी दीड लाख कोटी कमी कर्जांचा उठाव झालाय. तुम्हाला माहितीये की, बँकांची कमाई कर्जापासूनच होत असते. बँका आधीच एनपीएमुळे संकटात आहेत. एप्रिलमध्येच बँकेने म्हटलं होतं की, साठ वर्षांतला सगळ्यात कमी क्रेडिट ग्रोथ आहे. दहा ऑगस्टला स्टेट बँकेने म्हटलंय की, सगळ्या सेक्टरमधून क्रेडिटची मागणी कमी झालीय. रिअॅलिटी सेक्टर बरबाद झालाय.

जेपी ग्रुपची जेपी इन्फ्राटेकने आणि आम्रपाली ग्रुपच्या तीन कंपन्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलंय. त्यांचे ४७ हजार फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. यावरून स्पष्ट होतंय की मध्यमवर्गातला एक मोठा हिस्सा बरबाद होईल. बँका गुलाम बनवतील. फ्लॅटचे खरेदीदार जन्मभर व्याज भरत राहतील. फ्लॅट मिळेल की नाही या प्रश्नाचं उत्तर एखाद्या भावनिक मुद्दयाच्या आधारेच मिळेल.

हजारो लोक त्रस्त होऊन मला फोन करताहेत. मी सगळ्यांना हे सांगतो की, सोशल मीडियावर भक्त बनून दिवस-रात्र हिंदू मुस्लिम करत राहा. याव्यतिरिक्त काहीही होणार नाही. हिंदू-मुस्लिम केल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सगळ्या दुःखाचं निवारण होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासही दुरुस्त होईल आणि टीव्हीवालेसुद्धा हिंदू-मुस्लिममध्ये बिझी आहेच. याबाबतीत आपला ग्रोथ रेट चांगला आहे.

बाकी शेअर बाजार आपल्या रेकॉर्ड उंचीवर आहे आणि जीडीपी आठ टक्के होण्याच्या मार्गावर आहे. २००८पासून हेच ऐकत आलोय. कधी ना कधी आठ टक्के होईलच. मी पॉझिटिव्ह आहे.

(फेसबुकवरून साभार)प्रतिक्रिया द्या1653 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
रवींद शिवाजी गुरव - सोमवार , १४ ऑगस्ट, २०१७
श्रीदेवीच्या सिनेमाप्रमाणं नोटाबंदी फ्लॉप हे अगदी खरं... तरीही हे कर्ते करविते हिरो ठरतात त्याचं शल्य लोकशाहीलाही वाटतं आहे.
Pallavi - रविवार, १३ ऑगस्ट, २०१७
Your 100% absolutely right

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर