वागळेंचा शो बंद, ठाकुरतांचा राजीनामा
शुक्रवार, २१ जुलै, २०१७ बिगुल न्यूज नेटवर्क

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा शो बंद होणे तसेच ईपीडब्ल्यूचे संपादक प्रंजॉय गुहा ठाकुरता यांना राजीनामा द्यावा लागणे ही दोन्ही प्रसारमाध्यमांतील सरकारी हस्तक्षेपाची उदाहरणे आहेत. 

भारतात सगळ्याच क्षेत्रात वेगानं घडामोडी घडताहेत. काही अपेक्षित ब-याचशा अनपेक्षित. प्रसारमाध्यमांचं क्षेत्रसुद्धा त्याला अपवाद नाही. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या घटनांवरून काळ तर मोठा कठीण आला आहे…असे म्हणण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे.

निखिल वागळे यांचा शो बंद

पहिली घटना आहे मराठी पत्रकारितेमधील. टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीवर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा सडेतोड हा डिबेट शो एक मे पासून सुरू झाला होता. सध्याच्या मराठी वाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये वागळे यांचा हा शो सर्वाधिक लोकप्रिय होता. टीव्ही नाईन या वाहिनीला त्यामुळे अभिजनवर्गात प्रतिष्ठा मिळू लागली होती. परंतु गुरुवारपासून हा शो तडकाफडकी बंद करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यासंदर्भात सर्वप्रथम ट्विट केले. त्यानंतर वागळे यांनीही ट्विट करून त्याला दुजोरा दिला आणि टीव्ही नाइनने आपल्याशी जो करार केला आहे, त्या कराराचा भंग केल्याचे म्हटले आहे. टीव्ही नाइन ग्रुपची मालकी राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जात असल्यामुळे हे बदल होत असल्याचे समजते. राजीव चंद्रशेखर हे भाजपशी संबंधित खासदार असून त्यांनीच अर्णब गोस्वामी यांच्यासोबत भागीदारीत रिपब्लिक हे इंग्रजी चॅनल सुरू केले आहे. रिपब्लिक चॅनल भाजपच्या विचारांना वाहिलेले आहे. त्याच मालकाकडे टीव्ही नाइन जात असल्यामुळे हे बदल होत असून भाजपविरोधी भूमिका असलेल्या वागळे यांचा डिबेट शो बंद करण्यात येत आहे.

प्रंजॉय गुहा ठाकूरता यांचा राजीनामा

दुसरी घटना आहे राष्ट्रीय पातळीवरची. इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली (ईपीडब्ल्यू) या नामांकित नियतकालिकाचे संपादक प्रंजॉय गुहा ठाकुरता यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. कॉर्पोरेट सेक्टर आणि सरकारचे लागेबांधे उघड करणारे विश्लेषणात्मक लेखन प्रसिद्ध केल्याबद्दल करोडोंचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. त्यात संपादकांचा बळी गेला. यापूर्वी संघपरिवाराविरोधातील एक वृत्तांत प्रसिद्ध केल्याबद्दल आऊटलुकच्या संपादक आणि संबंधित प्रतिनिधीलाही नोकरीला मुकावे लागले होते.

इपीडब्ल्यूच्या १४ जानेवारी २०१७च्या अंकात – अडाणी समूहानं एक हजार कोटींची कर चोरी केली आहे काय ? – अशा शीर्षकाचा आणि २४ जून २०१७च्या अंकात - मोदी सरकारकडून अडाणी समूहाला पाचशे कोटींचा फायदा – अशा शीर्षकाचा असे दोन विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध करण्यात आले होते.

या दोन लेखांसंदर्भात अडाणी पॉवर लिमिटेडच्या वकिलांनी संबंधित लेखांचे लेखक, ईपीडब्ल्यू नियतकालिक आणि ते चालवणा-या समीक्षा ट्रस्टला कायदेशीर नोटिस पाठवली. हे दोन्ही लेख मागे घ्यावेत आणि वेबसाइटवरून हटवावेत, अशी मागणी संबंधित नोटिशीमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार समीक्षा ट्रस्टच्या बैठकीत संबंधित लेख हटवण्यासंदर्भात संपादकीय विभागाला सूचना देण्यात आल्या. त्यानंतर ठाकूरता यांनी तातडीने संपादकपदाचा राजीनामा दिला. समीक्षा ट्रस्टचे अध्यक्ष दीपक नय्यर आहेत, तर कार्यकारी मंडळावरइतिहासकार रोमिला थापर, राजकीय विश्लेषक राजीव भार्गव और समाजशास्त्रज्ञ दीपांकर गुप्ता यांचा समावेश आहे. मात्र त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप व्यक्त झालेली नाही. प्रंजॉय गुहा ठाकुरता यांनी जानेवारी २०१७ मध्ये सी. राममनोहर रेड्डी यांच्याकडून संपादकपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

दरम्यान, गुहा ठाकुरता यांनी अडाणी समूहाच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्यापूर्वी समीक्षा ट्रस्टची परवानगी घेतली नाही, असा आरोप विश्वस्तांनी केला. संपादकांनी अशा प्रकारे वकिलाच्या सेवा घेताना ट्रस्टची परवानगी घेणे अनिवार्य असून, त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे विश्वस्तांना तुरुंगात जावे लागले असते, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्याशी झालेल्या बैठकीत गुहा ठाकुरता यांनी राजीनामा दिला.

ईपीडब्ल्यूमधून प्रसिद्ध झालेले दोन्ही लेख द वायर या वेबसाइटवर अजूनही आहेत आणि ते काढण्याचा विचार अजिबात नाही, असे वायरचे संस्थापक-संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी स्पष्ट केले आहे. अडाणी समूह न्यायालयात गेला, तर आम्हीही त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर देऊ, असे त्यांनी बीबीसीला सांगितले. 

प्रसारमाध्यमांमध्ये सरकार आणि सरकारशी संबंधित घटक कशा प्रकारे हस्तक्षेप करीत आहेत, याचे उदाहरण म्हणून या बदलांकडे पाहावे लागेल. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसतसे हे बदल आणखी वेगाने होत जातील.प्रतिक्रिया द्या1850 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
WAGHMARE YADAV R - गुरुवार, २७ जुलै, २०१७
वागले सर नवीन वाहिनी चालू करावी
अरूण वानखेडे - रविवार, २३ जुलै, २०१७
लोकतंत्र वाचवण्याचे काम बुध्दिवान लोकांचे आहे. जे बुध्दीवंत ईमानदार , निश्स्पक्ष आहेत त्यांच्यावर खुप मोठी जबाबदारी येवुन ठेपली आहे.याप्रकरणाच्या माध्यमातुन त्यांनी बेध घेवुन वेळीच सावध राहण्याची गरज आहे
अनुराधा आहेर संपादिका स्नेहसखी मासिक - रविवार, २३ जुलै, २०१७
हि हुकूमशाही आहे काय ? मग लोकशाहीचा डंका कशासाठी. हि राज्यघटनेची पायमल्ली नाही काय?
Vijay Ahire - शनिवार, २२ जुलै, २०१७
राक्षसी बहूमताचा आणखी आपल्याला काय परिणाम भोगावे लागतील हे येणारा काळच ठरवेल...
vijayraj.dhotre - शनिवार, २२ जुलै, २०१७
बेलगाम सरकार
अ.वि.मेटकर - शनिवार, २२ जुलै, २०१७
Mr.Wagle in conducting the show, alwayes offensive &triedto put hs openion wth prejudiced way in the mouth of respondent. He also never found to conduct a show in balanceed manner. A Pofessionalisam of Reporter was missing frm him.
विशाल पवार. - शनिवार, २२ जुलै, २०१७
लोकशाहीचा गळा आवळण्याचं काम चालू आहे.
दिवाकर गांजरे - शनिवार, २२ जुलै, २०१७
लोकशाहीचा अर्थ कधी समजून घेणार सत्तारूढ पक्ष ?
omkar - शनिवार, २२ जुलै, २०१७
this is trruu
Pradeep niranjan Damodar - शनिवार, २२ जुलै, २०१७
सत्ते साठी सत्याचा व लोकशाहीचा गळा चिरला जातो, हम ही हुकूमशाही, समता, बंधुता, व न्याय याला संपवून टाकन्याच्या बेत आहे
दादाभाऊ अभंग - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
Tv9 वाहिनीने निखिल वागळे यांचा अचानक सडेतोड कार्यक्रम करणे चुकीचे आहे.हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय होता व अनेक लोक आवर्जून बघत होते.य्या कार्यक्रमामुळे tv9 चा trp वाढला होता.भाजपा सर्व मीडिया विकत घेवून भाजप विरोधकांचे आवाज बंद करून एक प्रकारे आणिबाणी आनत आहे अशी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे.
Vaibhav Vijay jadhav - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
हे एक प्रकारे लोकशाही वर घाला घालण्या चा प्रकार चालू आहे, ज्या पत्रकारतेला लोकशाही चा चौथा स्थंभ म्हणून ओळखले जाते, त्या वरच अप्रत्येक्ष रित्या बंधन घालत आहेत शेवटी रा स्व संघ आणि हिंदुत्वादी म्हणव नाऱ्या लोकांची जी काय थेर चालू आहेत त्याला जनता नक्की च लवकरच योग्य ते उत्तर देईल
Prashant Purna - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
Support with Nikhil Wagale and Thakurta
सहा. प्रा. देविदास प्रल्हादराव शंभरकर - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
ह्या घटना फारच खेदाच्या आहेत या सर्वांचा अंदाज होताच . अभव्यक्ती स्वातंत्र्याला बंधने घालून आपल्याच मर्जीत सर्वांनी रहावे अशी बंधणे लादण्यात येत आहे. यातून लोकशाही मूल्यांची गळचेपी होत आहे. देशात विकासाच्या नावावर अधोगती होत आहे की काय ही साधार शंका येत आहे. वन मॅन शो असणारी सत्ता अशी विरोधात बोलणार्याना भिऊन त्यांना गप्प करण्यात यशस्वी होत आहे. पण का? ........ हा प्रश्न अधोरेखित होत आहे.
गाेरख पंढरीनाथ पवार - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
हे तर हाेणारच आजकाल काय आहे समाेच्याची बाजु समजुन आपले मत व्यक्त करा नाहीतर कारवाईला सामाेरे जा विराेधात गेला तर तुमची खैर नाही ऊदा.मलिष्काचे काय झाले. वागळे कारवाईला काय झाले आणि महत्वाचे निवडणुकित आजकाल काय हाेते ते सांगायची गरजच नाही .
जगदीश कांबळे - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
सर आपण दुसरे स्व:ताचे न्युज चॅनेल चालू करा आम्ही तुमचे पाठीशी आहोत
Varadraj bapat - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
एकांगी हिंदू विरोधी द्वेष पूर्ण पत्रकारितेला योग्य चपराक मिळाली
S. Manoj - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
ही अघोषित आणिबाणि आहे.
R v Kulkarni. - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
While watching nikhil wagle shows it always seems bius. He never runs his shows in unbiased manner. He always find wrong in policies taken by bjp government. It might be ok if he is doing it without keeping prejudices. But his language is always offensive which I have not experienced about non bjp people. Actually these kind of pseudo people always give unfortunate upper hand to bjp. If these people understand what they are doing they will not have to shut their shows.
आनंद जोशी - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
निखिल जी केवळ पत्रकार असते आणि त्यांनी निष्पक्षपणे आपले मुद्दे मांडले असते तर त्यांच्या वर ही वेळ आली असती का हो?? टाळी एका हाताने नाही वाजत. त्यांचा जातिद्वेष आधी लक्षात घेतला तर बरं..
Chandrakant suryawanshi - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
Hate this government & bjp s politics
Swapnil Ghadge Patil - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
लोकशाहीची खुलेआम हत्या चालू आहे भाजपच्या काळात. सत्तेच रक्त लांडग्याच्या तोंडाला लागलं आहे , आता हा लांडगा अशा हत्या करत सुटणार आणि विकत घेतलेली माध्यम याकडं पद्धतशीर पणे डोळेझाक करणार हे नक्की
अनिल खांडेकर - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
पत्रकार निखिल वागले आणि परंजोय गुहा ठाकूरता या दोन पत्रकारांबाबत घडलेल्या घटना वरवर पहाता वेगल्या आहेत. पण त्या मागिल हस्तक्षेप करणारा हात कोणाचा हे महत्वाचे. सरकारी यंत्रणा असो, आर्थिक ताकद असो किंवा झुंड शाही असो, सामान्यांपासून पत्रकार, लेखक , कलाकार .. कोणाच्या ही स्वातंत्र्यावर गदा येणे लोकशाही , घटना यांची विटंबना आहे. काल सोकावण्यापूर्वी त्या चा विरोध करणे अगत्या चे आहे..
Nitin - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
he honar hote. Aanibani chal zhali aahe.
Prakash Eknath Bagul - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
वागळे सर कोणत्याही चॅनेल एडिटर म्हणून आपली भूमिका बाजवतील तो चॅनेल प्रसिध्द होत आहे. व वागळे सर चार ही बाजूचा पूर्ण समजून घेतल्या शिवाय ते बोलत नाही. कदाचित काही लोकांना त्यांचे स्पष्ट बोलणे आवडत नाही. कारण सत्य बोलले कधीही कडू लागते, आणि वागळे सर सत्यशोधक वृत्ती आहे. म्हणून त्यामुळे आपणास हा त्रास सहन करावा लागतो सर
गजानन - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
हा सर्रास अन्याय आहे निखिल वागळे हे सडेतोड मधे निर्भिड पणे मत मांडून सरकारचे वाभाडे काढायचे
दादाराव पवार - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
लोकशाही भारतात धर्मवेडया सत्ताधाऱ्यांकडून निर्भीड व वास्तववादी पत्रकारीता करणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय. जेष्ठ पत्रकार निखील वागळे सरांचा ' शो ' तडकाफडकी बंद केलेल्या TV 9 चॅनलच्या मॅनेजमेंट मंडळींचा जाहिर निषेध आज पासुन TV 9 चॅनल पाहणे मी बंद करतोय.
Ashiwin mahale - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
याने काय ठेका घेतलाय का. ? आणी फक्त भाजप का काग्रेस आप चुकत नाही का फक्त भाजपच चुकतेय. तुम्ही पञकार आहात समाज हिताचे सर्व प्रक्ष मांडा. फक्त एक गटाला विरोध का.
विष्णू बनकर मुं.पो. अंढेरा ता देऊळगांवराजा जि.बुलडाणा - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
लोकशाही व्यवस्थेमध्ये भाजपा सरकार अभिव्यकती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे त्यांचं हे षडयंत्र आपल्या सारखे जागृतजागृत हाआणुन पाडतील....
Onkar joshi - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
I think the journalism must be unbiased. Though BJP leader is active participant in shut down of Wagale's show, Wagle also dont have any authority to be as anti-bjp( as clearly written in the text) . Being a journalist his views must not be affected by bjp or anti bjp thought process. Hence, if this show is shut down, he can always conduct debate by other medium if he has clearity of non partial thoughts. But , yes , if the news is clearly true , the involvement of any party leader inside media industry or being partial of any journalist is not acceptable. This must be stopped as early as possible. Good luck to wagle for his career.
सचिन रामाणे - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
I always support to ture news and this the I always support to ture news and this the time to exposed to all social politics and pro agenda goverment and thanks to all brave people.....🙏🙏🙏
चंद्रकांत दगडू झिरपे - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
वागळे सरांचा हा कार्यक्रम बंद करणे अयोग्य आहे . वागळे सर नेहमीच योग्य बाजू मांडतात . प्रथम ibn लोकमत मध्ये आजचा सवाल हा prime शो खूप लोकप्रिय झाला,पण तिथूनही त्यांना घरी पाठवले,, त्यानंत ibn लोकमत ची trp पण खूप कमी झाली.. Tv 9 मराठी वरील शो हा खूप लोकप्रिय झाला.... दोन दिवसापूर्वी मुंबई तील SRA मध्ये संदिप ने जो भ्रष्टाचार उघडा केला त्यात राम कदम यांच् नाव आले आहे व वागळे सरांनी त्या दिवशी त्यांचा भरपूर समाचार घेतला,,त्यामुळेच मला वाटते हा निर्णय बीजेपीच्या सांगण्यावरून घेतला आहे.
अजय तेलंग, सांगली - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
यात सरकारी हस्तक्षेप कुठे झाला ? नोटिशीला भिऊन हा निर्णय झाल्याचे स्पष्ट आहे. चुकीच्या बातम्या देण्याचा किंवा तुमच्या सोयीचे निष्कर्ष काढण्याचा हा खटाटोप थांबवा हो. पीतपत्रकारिता करू नका.
गजानन शिंदे - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
राजकीय वापर करून लोकशाहीचा गळा दाबला जात आहे. याचा बदला जनता निवडणुकीतून घेईल.
विद्याविलास पाठक - शुक्रवार, २१ जुलै, २०१७
राजीनामा देण्याऐवजी ठाकुरता यांनी नोटिशीला न्यायालयात आव्हान देऊन आपल्या कडे असलेले पुरावे दिले असते तर ते योग्य ठरले असते. आव्हानाला सामोरे न जाता राजीनामा हा पलायनवाद नाही का?

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर