अलंकापुरीत पूर; इंद्रायणीचे पाणी मंदिरात
शुक्रवार, १४ जुलै, २०१७ बिगुल न्यूज नेटवर्क

आळंदी शहरातून वाहणा-या इंद्रायणी नदीच्या क्षेत्रात लागलेल्या पावसाच्या संततधारेने शहरात पूर आला आहे. पाणी नदीचा काठ सोडून पुंडलिक मंदिरात शिरल्याने मंदिर दर्शनासाठी बंद झाले आहे. 

आळंदी: येथील इंद्रायणी नदीच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. इंद्रायणी नदीने काठ सोडला असून पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर दर्शन बंद झाले आहे.

इंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेले रस्ते आणि भक्तीसोपान पूल पाण्याखाली गेल्याने लगतच्या पूर्व किना-यावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी जनतेला दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक, शालेय मुले, प्रवासी गर्दी करून पावसाचा आनंद लुटत आहेत.

येथील रस्ते विकासाला गती देण्याची मागणी भाविक-नागरिकांतून होत आहे. आळंदी नगरपरिषदेने आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ते वापरास योग्य आणि खड्डेमुक्त करण्याचे काम हाती घेतले असल्याचे बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड यांनी सांगितले.प्रतिक्रिया द्या5278 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर